सध्या सोन्याचे दर चांगलेच वाढले आहेत. वाढत्या सोन्याच्या किमतीने संख्या नागरिक अवाक झाला आहे.चला जाणून घेऊयात आज किती वाढल्या सोन्याच्या किमती –
आज बाजारातील सोन्याचा क्लोजिंग रेट जाणून घ्या
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या सोन्याच्या दरानुसार शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57189 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर आज सकाळी हा दर 57062 रुपये प्रति ग्रॅम होता. अर्थात आज दिवसभरात सोन्याच्या दरात 127 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे भाव 57 हजारांच्या पार गेल्याने नागरिक अवाक झाले आहे. सोने लवकरच 60 हजारांचा टप्पा गाठेल असे काही तज्ञ सांगत आहेत.
चांदीच्या किमती
चांदीचा दर 68192 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. हा दर आज सकाळी 68350 प्रति किलोच्या पातळीवर होता. त्यामुळे आज चांदीच्या दारात दिवसभरात 158 रुपयांची घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय आहेत दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची झपाट्याने खरेदी-विक्री होत आहे. आज अमेरिकेत सोन्याचा भाव $0.16 च्या वाढीसह $1,930.73 प्रति औंस या दरावर ट्रेड करत असून चांदी $0.19 ने घसरून $23.73 प्रति औंस या दरावर ट्रेड करत आहे.