आज सकाळपासूनच देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे.
आज देखील सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. येथे दिलेले दर एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर असल्याने ते करमुक्त आहेत, त्यामुळे देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत जाणवेल.
सोन्या-चांदीचे दर किती बदलले? पहा..
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 56990 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर उघडला आहे. काल हा दर 56670 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता.
त्यामुळे आज सोन्याचा दर 320 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला. सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून 107 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. आज चांदीचा दर किलोमागे 68509 रुपये इतका आहे.
सकाळी MCX वर सोने कोणत्या दरात होते ते जाणून घ्या
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने तेजीत आहे. फेब्रुवारी 2023 साठी सोन्याचा फ्युचर्स ट्रेड 147.00 रुपयांच्या वाढीसह 56,693 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, मार्च 2023 साठी चांदीचा फ्युचर्स ट्रेड 583.00 रुपयांच्या वाढीसह 68,942.00 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.