संशोधकांना 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सोनं सापडलं आहे. ही ममी १९१६ मध्ये सापडली होती, पण आजतागायत त्यावर संशोधन झालेले नाही. इजिप्तमधील पिरॅमिड आणि त्याच्या ममींबद्दल च्या संशोधनात नवीन माहिती समोर आली आहे.
आता पुरातत्त्वशास्त्रज्ञांना २३०० वर्षे जुन्या ममीमध्ये खजिना सापडला आहे. इजिप्तमधील एका ममीला सोन्याचे हृदय आणि सोन्याची जीभ सापडली आहे. इतकंच नाही तर या ममीमध्ये 49 सोन्याचे तावीजही सापडले आहेत. यामुळे शास्त्रज्ञांसह सर्वांच्याच कुतूहलाचा विषय बनला आहे.
इजिप्शियन पिरॅमिडवर संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. त्यातून प्रत्येक वेळी नवी माहिती समोर येते. आता संशोधकांना 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सोनं सापडलं आहे. ही ममी 1916 मध्ये सापडली होती, पण आजतागायत त्याचा अभ्यास झालेला नाही.
कैरोयेथील इजिप्शियन म्युझियमच्या स्टोअर रूममध्ये ही ममी १०० वर्षांहून अधिक काळ पडून होती. कैरो युनिव्हर्सिटीच्या डॉ. सहार सलीम यांच्या टीमने जेव्हा या ममीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या गोष्टीपाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
१९१६ मध्ये संशोधकांना सापडलेली ममी एका किशोरवयीन मुलाची असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मृत्यूच्या वेळी त्याचे वय १४ ते १५ वर्षांच्या दरम्यान असावे, असा संशोधकांचा दावा आहे. शास्त्रज्ञांच्या एका टीमने सीटी स्कॅनरच्या मदतीने या ममीचा अभ्यास केला आहे.
सीटी स्कॅनरच्या साहाय्याने काढलेल्या ममीच्या फोटोंमध्ये नवी माहिती समोर आली आहे. या फोटोमध्ये या किशोरवयीन मुलाच्या ममीमध्ये 49 वेगवेगळ्या प्रकारचे तावीज, सोन्याचे हृदय, सोन्याची जीभ, तसेच 21 वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. त्यातील अनेक सोन्याच्या आहेत. संशोधकांना ही ममी दक्षिण इजिप्तमधील एडफू भागात सापडली. ही ममी १९१६ मध्ये सापडली होती. मात्र, आता यावर संशोधन करण्यात आले आहे.
या ममीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने संशोधकांनी या ममीला ‘गोल्डन बॉय ममी’ असे नाव दिले आहे. गोल्डन बॉय ममी १९१६ मध्ये सापडली. त्यानंतर ही ममी इजिप्तची राजधानी कैरो येथील इजिप्शियन म्युझियममध्ये ठेवण्यात आली होती.