अनेकदा आपल्याला बँक खात्यात मिनिमम बॅलन्स Bank Account Minimum Balance न ठेवल्याने दंडाला सामोरे जावे लागते. अनेक बँकांनी मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबत नियम केले आहेत.
आता खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तरी भविष्यात तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. नवीन नियम बनल्यानंतर तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही.
मिनिमम बॅलन्सवर मोठे विधान
खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याबाबत अर्थ राज्यमंत्री भगवंत किशनराव कराड यांनी गेल्या काही दिवसांत मोठे विधान केले होते. त्यांनी बँकांच्या संचालक मंडळाला आवाहन करून किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांच्या खात्यावरील दंड रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकता, असे सांगितले. कराड म्हणाले होते की, बँका या स्वतंत्र संस्था आहेत. अशा स्थितीत संचालक मंडळ किमान रक्कम न ठेवल्यास दंड माफ करू शकते.
किमान रक्कम ठेवण्याबाबत माध्यमांनी अर्थ राज्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. ज्या खात्यांमध्ये विहित किमान पातळीपेक्षा कमी ठेवी जातात त्यावर कोणताही दंड आकारला जाऊ नये, अशा सूचना बँकांना देण्याचा सरकार विचार करत आहे का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला.