ह्युंदाई क्रेटा ही देशातील सर्वात जास्त विकली जाणारी मिड साइज एसयूव्ही Mid Size Suv आहे. आतापर्यंत या एसयूव्हीचे 8.3 लाख युनिट्स विकले गेले आहेत. जानेवारी 2023 हा महिना ह्युंदाई क्रेटासाठी ही सर्वोत्तम महिना ठरला आहे. मात्र लवकरच ह्युंदाई क्रेटास टक्कर द्यायला मार्केटसज्ज होत आहे. दोन नवीन मिड साइज एसयूव्ही भारतीय बाजारात येत आहेत. चला जाणून घेऊया त्यांची अधिक माहिती
1. 2023 किआ सेल्टोस फेसलिफ्ट Kia Seltos Facelift 2023 :
सध्या सेल्टोस ही देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी मिड-साइज एसयूव्ही आहे. ह्युंदाई क्रेटाला खरी टक्कर या एसयूव्हीची मिळत आहे . 2019 मध्ये लाँच झाल्यापासून ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. आता ही नव्या अवतारात येणार आहे. यात पूर्णपणे रिडिझाइन केलेला फ्रंट फेसिया आणि रियर एंड मिळेल. Kia Seltos Facelift जूनच्या आसपास लाँच होण्याची शक्यता आहे. यात 1.5 लीटरचे चार सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 160 पीएसपॉवर आणि 253 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल.
2. होंडा मिडसाइज एसयूवी Honda Midsize Suv:
किया व्यतिरिक्त होंडा एक मिड साइज एसयूव्ही देखील आणणार आहे. याची झलक कंपनीने महिनाभरापूर्वी सादर केली होती. हे या उन्हाळ्यात लाँच केले जाऊ शकते. मध्यम आकाराची ही एसयूव्ही अमेझ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. याचे डिझाइन नवीन जेनरेशन WR-V द्वारे प्रेरित असेल. परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर यात 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर दमदार हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिसेल.