सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंट केले जाते. ऑनलाईन पेमेंट द्वारे आज हजारो रुपयांचे व्यवहार केले जातात. UPI हा पेमेंट करण्याच्या सर्वात लोकप्रिय मार्गांपैकी एक आहे. याद्वारे काही मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवले जातात.
UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. दरम्यान आता UPI युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. एका दिवसात किती पेमेंट करावे या बाबत नियम बदलले आहेत.
ही असेल नवीन व्यवहार मर्यादा
NPCI च्या नियमांनुसार, तुम्ही UPI द्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचे व्यवहार करू शकता. तसेच, ही मर्यादा बँकेप्रमाणे वेगवेगळी असू शकते. कॅनरा बँकेत ही मर्यादा फक्त 25000 रुपये आहे तर SBI मध्ये ही मर्यादा 1 लाख रुपये आहे. तसेच तुम्ही एका दिवसात कमाल 20 UPI ट्रॅन्जेक्शन करू शकता.
जाणून घ्या अन्य नियम
जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर तुम्ही तुमची डेली ट्रांजेक्शन लिमिट वाढवू शकता. कारण एका नंबर 4 खात्यांशी जोडले जाऊ शकते. तसेच, तुम्ही तुमच्याच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवल्यास, ते तुमच्या मर्यादेत मोजले जात नाही. त्याचप्रमाणे मर्चेंट पेमेंट तुमच्या खात्याच्या मर्यादेत जोडले जात नाहीत.
Paytm अॅपची ही आहे लिमिट
Paytm UPI द्वारे तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता, तसेच एका तासात फक्त 20000 हजार रुपये ट्रान्सफर करता येतात.