सर्वच शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. पीक कर्ज pik Karj घेताना अनेक अडचणी येतात. दरम्यान आता शेतकऱ्यांची पीक कर्ज घेण्यासाठीच्या जाचक अटीतून मुक्तता होणार आहे. नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकाना सिबिल स्कोरची Farmer Cibil Score अट लावता येणार नाही.
आता पीक कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट न लावता कर्ज द्यावे लागणार आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला एक पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, पीक कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँकांनी ‘सिबल’ अथवा ‘सिविल स्कोअर’ चे बंधन घालू नये.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशात त्यासबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी सिविल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे. याचा आता शेतकऱ्यांना खूपच फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स व्हाट्सएपवर मिळवण्यासाठी जॉईन व्हा
मागील काही काळापासून शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. अतिवृष्टी,अवकाळी पाऊस, अतिथंडी आदी कारणाने त्रस्त शेतकरी बँकेतून पीक कर्ज घेतात. मात्र, त्याचा भरणा वेळेवर होत नाही आणि त्याचा परिणाम पुढच्या वेळी त्याला बँक कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येतो. शेतकरी पीक कर्ज घेतात आलेल्या पैशांमधून ते पिक आणि त्या पीक कर्जातून शेतात पेरणी केली जाते.
या पिकातून कर्जाची परतफेड करत असतात.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या उभ्या पिकाला बँकेत तारण ठेवलेलं असतं. त्यामुळे पीक कर्जाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गॅरंटी लागत नाही. तरी देखील बँका शेतकऱ्याचे सिबिल पाहूनच त्यांना कर्ज देत असत. परंतु, पिक चांगले आले नाही तर कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे सिबिल खराब होते आणि त्यांना बँकेतून कर्ज मिळत नाही. परंतु, आता या सिबिलमधून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.