रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी एचडीएफसी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. बँक दरवाढ ७ फेब्रुवारी २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. एमसीएलआर दर बँकेच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आला आहे.
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने एमसीएलआरमध्ये १० बेसिस पॉईंट्सची (बीपीएस) वाढ केली आहे. रातोरात एमसीएलआर दर आता ८.६० टक्के झाला आहे. एक महिन्यासाठी एमसीएलआर ८.६० टक्के, तीन महिन्यांसाठी ८.६५ टक्के आणि सहा महिन्यांसाठी ८.७५ टक्के आहे.
एका वर्षासाठी एमसीएलआर ८.९० टक्के करण्यात आला आहे. जो पूर्वी ८.८५ टक्के होता. तर दोन वर्षांसाठी एमसीएलआर ९ टक्के आणि तीन वर्षांसाठी एमसीएलआर ९.१० टक्के आहे.
MCLR म्हणजे काय? : मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट किंवा एमसीएलआर हा किमान व्याजदर असतो. ज्यावर वित्तीय संस्था कुणाला कर्ज देतात. कोणतीही बँक कोणालाही कमी व्याजदराने कर्ज देऊ शकत नाही. हा दर रिझर्व्ह बँकेने लागू केला आहे