Bone Health: मटण खाणारे अनेक शौकीन आहेत. मटण खाण्यावरून आपल्याकडे अनेक मतमतांतरे आहेत. दरम्यान जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ते मात्र आवडीने मटण खातात. मटनामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. लोकांमध्ये असा समज आहे की ते जितके जास्त मटण खातील तितके जास्त प्रथिने मिळतील.
परंतु एक लक्षात घ्या की, प्रथिनांसाठी फक्त मांसावर अवलंबून राहिलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. एका रिपोर्टनुसार विशेषतः एनिमल प्रोटीन हाडे कमकुवत करू शकतात. विविध स्टडींमध्ये असे दिसून आले आहे की एनिमल प्रोटीन वनस्पती-आधारित प्रथिनांपेक्षा हाडे अधिक कमकुवत करतात.
काही संशोधन असे सांगतात की, जे लोक जास्त प्रमाणात मटण खातात त्यांना ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक असते.
नॉनव्हेज खाल्ल्याने हाडे खरच कमकुवत होतात का?
एका मोठ्या मीडिया रिपोर्टसच्या हवाल्याने एका पोषणतज्ञ च्या एका पोस्टनुसार मांस किंवा वनस्पती-आधारित प्रथिनांच्या सेवनामुळे हाडांवर कसा परिणाम होतो हे सांगितले आहे. त्यात त्यांनी असे सांगितले आहे की, हाई प्रोटीन डाइटमुळे आपल्या हाडांच्या आरोग्यावर तसेच कॅल्शियमच्या शोषणावर देखील त्याचा परिणाम होतो.
हाडांच्या आरोग्यासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण आहेत, परंतु जास्त प्रमाणात एनिमल प्रोटीन विशेषत: रेड मीट आपल्या हाडांना हानी पोहोचवू शकतात.
प्रथिनांसाठी मांसावर अवलंबून राहणे चुकीचे
पुढे सदर पोस्टमध्ये पोषण तज्ज्ञ लिहितात की, तुम्हाला प्रोटीन हवे असेल तर भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा.
पोषणतज्ञांच्या मते, मांसामध्ये फॉस्फरस टू कॅल्शियम रेश्यू असतो जे कॅल्शियम उत्सर्जन वाढवते आणि हाडांचे क्षीणीकरण होऊ शकते.
आहारात समतोल आवश्यक
प्लांट बेस्ड असो की एनिमल बेस्ड या दोन्हींमध्ये दोन्ही प्रथिने भिन्न अमीनो ऍसिड रचना आहेत आणि म्हणून एकमेकांद्वारे पूर्णपणे बदलले जाऊ शकत नाहीत परंतु त्यांच्यामध्ये संतुलन राखले जाऊ शकते.
जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत आहारात कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.