जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा त्याचा इफेक्ट चेहऱ्यावरही जाणवायला लागतो. चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा पडताना दिसतात. अर्थात हे आपण वृद्ध होत आहोत याचेच एक संकेत असतो.
एक लक्षात घ्या की, वय वाढणे हे एक नैसर्गिक प्रक्रियाचा भाग आहे. ही प्रक्रिया आपण थाम्बवू शकत नाही. परंतु काही गोष्टी अशा आहेत की ज्याद्वारे आपण त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हे कमी करू शकतो.
चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर..
त्वचा, केस आणि नखांमध्ये आढळणारे केरोटीन हे त्वचेवर सुरकुत्या येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महत्वाचे मानले जाते. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे जे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. याठिकाणी आपण अशा काही पदार्थांविषयी जाणून घेऊयात की ज्यात केराटिनचे प्रमाण खूप जास्त असते.

सूर्यफुलाच्या बिया Sunflower Seeds
सूर्यफुलाच्या बिया अतिशय चवदार आणि पौष्टिक असतात. हे खाल्ल्याने केराटिनचे शरीरातील प्रमाण वाढते. या बिया केसांना मजबूत आणि कंडीशन करतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये पॅन्टोथेनिक ऍसिड, सेलेनियम, तांबे आणि व्हिटॅमिन ई असते.

अंडी Egg
अंडी खाल्ल्याने शरीरात केराटिन तयार होते. केराटिनच्या उत्पादनासाठी बायोटिन आवश्यक आहे, अंडी हे बायोटिनचा एक चांगला स्रोत आहे ज्यापासून केराटिन तयार होते. एका मोठ्या अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रथिने आढळतात ज्यामुळे केराटिनची निर्मिती वाढण्यास मदत होते.

लसूण Garlic
लसूणमध्ये एन-एसिटिलसिस्टीन नावाचे वनस्पती-आधारित अँटिऑक्सिडेंट असते जे केसांच्या पेशींना सूर्याच्या नुकसानीपासून वाचवते आणि केसांच्या निरोगी वाढीसाठी ते आवश्यक असते. त्याचप्रमाणे लसणामध्ये व्हिटॅमिन सी, बी6, मॅंगनीज आणि इतर अनेक खनिजे आढळतात.

कांदा Onion
कांद्याचे सेवन करणे देखील फायद्याचे ठरते. ते खाल्ल्याने शरीरातील केराटिनचे उत्पादन वाढते. त्याचप्रमाणे कांद्यामध्ये फोलेट देखील आढळते जे केसांच्या रोमांना मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे जीवनसत्व आहे.

रताळे Sweet Potato
रताळ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये बीटा-कॅरोटीन, तसेच एक प्रकारचे प्रोविटामिन एअसते की जे केराटिन बनवते. जेव्हा शरीर हे केराटिन वापरते तेव्हा ते व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. ज्यामुळे तुमचे केस खूप निरोगी होतात. रताळे सामान्य बटाट्यापेक्षा जास्त फायदेशीर मानले जातात.

गाजर Carrots
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी-8, पॅन्टोथेनिक ऍसिड, फोलेट, पोटॅशियम, लोह, तांबे आणि मॅंगनीज आणि इतर अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे गाजरांमध्ये आढळतात. गाजरात भरपूर फायबर आणि बीटा कॅरोटीन आढळते. जे सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते आणि खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्यास मदत करते.