Health Tips : आपल्या स्वयंपाक घरामध्ये विविध पदार्थ असतात. परंतु काही पदार्थ असे असतात की, ज्याद्वारे आपले आरोग्य अत्यंत निरोगी राहण्यास मदत होते. यापैकीच एक म्हणजे कोथांबीर Coriander.
कोथिंबीरचा Coriander वापर भाजीमध्ये, सलाड म्हणून देखील करतो. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, कोथिंबीरीचे तुम्ही रोज सेवन केले तर तुमचे वजन नियंत्रणात तर राहतेच शिवाय मेंदूचे आरोग्य चांगले राहते. शिवाय त्वचा, हृदय आदींचे आरोग्य संभाळण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते.
चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात –
तुम्ही रोज सकाळी कोथिंबीरीचे पाणी पिऊ शकता. यासाठी कोथिंबीर पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून आणि नंतर उकळून घ्या. थोडा वेळ कोथिंबीर उकळल्यानंतर ते पाणी गाळून थंड करा आणि मग प्यावे.
वजन नियंत्रण
कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्याचाच चांगला परिणाम म्हणजे वजन नियंत्रण.
या पाण्याने कॅलरीज बर्न तर होतातच पण अनावश्यक चरबी कमी होते.
त्वचा निरोगी राहते
कोथिंबीरचे पाणी रक्त शुद्ध करण्याचे काम करते. रक्त अशुद्ध असेल तर त्वचा समस्या उद्भवते. कोथिंबीरीच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीराला डिटॉक्स करतात आणि त्वचा चमकदार बनवतात. त्यामुळे मुरुम समस्या दूर होतात.
लिव्हर
कोथिंबीर आपल्या लिव्हरसाठीदेखील खूप फायदेशीर असते. कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने यकृत स्वच्छ होते. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून लिव्हर डिटॉक्स करण्याचे काम करते.
डायबेटीस
ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी कोथिंबीर उपयुक्त ठरू शकते. एका रिपोर्टनुसार काथिंबीर एंजाइमची क्रिया वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील शुगर कमी होते.
मेंदूचे आरोग्य
कोथिंबीर मध्ये अनेक असे घटक आहेत की जे, मेंदूला निरोगी ठेवतात. पार्किन्सन्स, अल्झायमर आणि मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारख्या मेंदूच्या आजारांवर कोथिंबिरीने उपचार करता येतात. त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.
रोगप्रतिकार शक्ती
हिरवी कोथिंबीर मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची मोठी ताकद असते. हिरव्या कोथिंबीरमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रक्तदाब कमी करते, हृदयविकाराचा धोका कमी करते तसेच रक्तातील लोहाची कमतरता भरून काढते.