Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक गंभीर नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला चहा आणि चपाती हे अनहेल्दी फूड कॉम्बिनेशन का आहे हे सांगणार आहोत. याचे सेवन केल्याने तुम्हाला गॅस, ऍसिडिटी आणि शरीरात रक्ताची कमतरता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, तर चला जाणून घेऊया चहासोबत चपाती का खाऊ नये याविषयी सविस्तर..
ऍसिडिटीची समस्या
जर तुम्ही चपाती चहाचे सेवन केले तर यामुळे आपल्या पोटात तीव्र सूज आणि एसिड रिफ्लक्स होऊ शकते. कारण चहा किंवा कॉफीसोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या पोटातील ऍसिड-बेस बॅलन्स खराब होऊ शकतो.
रक्ताची कमतरता
संशोधनानुसार, चहामध्ये असलेले फिनोलिक केमिकल्स पोटात आयरन-कॉम्प्लेक्स तयार करण्यास उत्तेजन देतात, ज्यामुळे शरीरात लोह शोषणात अडथळा येतो. त्यामुळे जेवणासोबत चहाचे सेवन करू नये, विशेषत: ज्यांना लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आहे त्यांनी तर करूच नये.
पोषक द्रव्ये शरीरात पोहोचण्यापासून रोखतात
जर तुम्ही चपातीसोबत चहा चे सेवन केले तर ते आपल्या शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा आणते. चहामध्ये टॅनिन नावाचे रसायन असते, जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्यूट्रिएंट्स म्हणून काम करते. एका अभ्यासानुसार, टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी 38% कमी करते. चहा शरीराला पोषक द्रव्ये वापरण्यापासून रोखतो, म्हणून चहासोबत चपाती खाणे चांगले कॉम्बिनेशन मानले जात नाही.
चहाचे सेवन कसे करावे?
कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर किमान ४५ मिनिटांनी चहा प्यावा. नाश्ता किंवा दुपारच्या जेवणानंतर एक तासाने किंवा संध्याकाळी स्नॅक्ससह चहाचे सेवन करणे चांगले.