Health Tips : अंडी हे खूप लोकप्रिय असे खाद्य आहे. काही खवय्ये खास अंड्यांच्या रेसिपीसाठी प्रसिद्ध आहेत. अंड्याचे शरीरास खूप फायदे असतात. पण हे सुपरफूड सर्वांसाठीच फायदेशीर असेलच असे नाही. 5 अशा समस्या, आजार आहेत की ज्यामध्ये अंड्याचे खाणे टाळलेच पाहिजे.
1. हृदयरोग
अनेकांचे कोलेस्टेरॉल वाढते अन त्यामुळे त्यांना हृदयरोगाचे चान्सेस वाढतात. त्यामुळे ज्यांना असा धोका आहे त्यांनी मात्र अंड्याचे प्रमाण कमी ठेवावे. खाणे टाळावे. कारण अशा व्यक्तींना कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे असते.
2. त्वचा रोग
अंडी ही मूलतः उष्ण असतात. त्यामुळे जर अंड्यांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे ज्यांना पिंपल्स येण्याचा जास्त त्रास आहे त्यांनी अंड्याचे अतिसेवन टाळावे.
3. इंसुलिन रेसिस्टेंस
जर एखादी व्यक्ती दररोज एका मर्यादेपेक्षा जास्त अंडी खात असेल तर त्याचे शरीर इन्सुलिन रेसिस्टेंस बनू शकते. त्यामुळे आहारात किती अंडी असावीत हे तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही ठरवू शकता.
4. इनडाइजेशन
जर तुमची पचनक्रिया बरोबर नसेल तर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी आदी समस्या जाणवतात. अशा व्यक्तींनी अंडे खाणे टाळावे. अंड्याच्या अतिसेवनाने अनेक लोक पोटदुखीची तक्रारही करतात.
5. कर्करोगाचा धोका
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की जे लोक जास्त अंडी खातात त्यांना कोलोरेक्टलसह इतर प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे अंड्यांचे प्रमाण आहारात सीमितच ठेवावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला आवश्य घ्यावा)