सध्याच्या धकाधुकीच्या काळात सर्वच जीवनशैली बदलून गेली आहे. परंतु याचा विपरीत परिणाम शरीरावर होत आहे. अनेक नागरिकांत सध्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचत नसल्याने हे आजार बळावतात.
त्याचप्रमाणे जर रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचले तर हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आदी समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु जर हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल तर त्याची लक्षणे शहरात इतर भागात दिसून येतात. चला जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर..
अपचनाची समस्या
हृदयाशी संबंधित आजारांचे एक प्रमुख लक्षण म्हणजे अपचन होणे. लोक अनेकदा अस्वस्थतेचा अर्थात बेचैनीचा संबंध अपचनाशी जोडतात आणि त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. छाती आणि पोटात जळजळ होण्यासोबतच तुम्हाला अस्वस्थता जाणवत असेल तर ते हृदयाशी संबंधित आजारांना सूचित करते. काहीवेळा पोटाशी संबंधित आजारांमुळे अशा प्रकारच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. परंतु ही समस्या अनेक दिवस राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
छातीभोवती ओढल्यासारखे वाटणे
छातीभोवती ओढल्यासारखे वाटणे हे हृदयाशी संबंधित आजाराचे लक्षण असू शकते. छातीमध्ये जडपणा, छातीत अतिरिक्त दाब जाणवणे ही काही लक्षणे आहेत जी हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांसारखी दिसतात. जर तुमच्या छातीत दुखणे खूप वाढले असेल आणि असह्य झाले असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटणे महत्वाचे आहे.
जबडा आणि मानेभोवती दुखणे
जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा केवळ छातीत दुखत नाही तर शरीराच्या इतर भागांवरही याचा परिणाम होतो. जर तुम्हाला तुमच्या जबड्यात किंवा मानेभोवती विनाकारण दुखत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे अत्यावश्यक आहे.
अत्यंत थकवा
हृदयाशी संबंधित समस्यांचा थेट संबंध अपुऱ्या रक्तपुरवठ्याशी असतो. या काळात शरीराच्या काही भागांमध्ये पुरेसा रक्तपुरवठा होत नाही ज्यामुळे रुग्णाला दम लागतो आणि थकवा जाणवतो. या काळात अगदी कमी शारीरिक हालचालींमुळेही व्यक्ती खूप थकायला लागते.
सूचना:वरील सर्व माहिती ज्ञानावर आधारित आहे.वैद्यकीय सल्ला घेणे चांगले