Honda Activa H-Smart Scooter : दुचाकी प्रेमींसाठी खुशखबर आहे. जर तुम्ही नवीन दुचाकी घेण्याच्या विचारत असाल तर Honda Motorcycle & Scooter India (HMSI) ने आपली नवीन दुचाकी Honda Activa H-Smart भारतात लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे नवीन टेक्नॉलॉजिकल एप्लिकेशनसह ही स्कूटर स्टँडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट अशा तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिली गेली आहे.
Honda Activa H-Smart Scooter ची किती आहे किंमत
Honda Activa H-Smart च्या स्टँडर्ड व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 74,536 रुपये आणि डीलक्स व्हेरिएंटची किंमत 77,036 रुपये आहे. स्मार्ट व्हेरियंटची किंमत 80,537 रुपये आहे.
कंपनीचे नेमके काय म्हणणे आहे ?
HMSI चे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, ग्राहकांच्या मागणीनुसार ही नवीन Activa H-Smart बाजारात आणली आहे. त्यांनी सांगितले की नवीन Activa मध्ये OBD2 डिवाइस वापरण्यात आले आहे. पुढे, व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, या नवीन अॅक्टिव्हामध्ये ग्राहकांना उच्च किमतीच्या स्कूटरमध्ये आढळणारी अनेक महत्त्वाची फीचर्स देण्यात आली आहेत.
OBD2 डिव्हाइस नेमके काय आहे?
कंपनीने उत्सर्जन पातळीची माहिती ठेवण्यासाठी ऑन-बोर्ड सेल्फ-डायग्नोस्टिक (OBD2) उपकरणासह ही आपली नवीन Honda Aciva H-Smart स्कूटर लॉन्च केली आहे. OBD2 डिव्हाईस वाहनाची खरी उत्सर्जन पातळी अपडेट करत राहते. हे एक प्रकारचे मॉनिटरिंग डिव्हाइस आहे जे उत्सर्जनाशी संबंधित विविध पॅरामीटर्स जसे की उत्प्रेरक कन्व्हर्टर आणि वाहनाचे ऑक्सिजन सेन्सर यांचे सतत निरीक्षण करते आणि उत्सर्जन स्तरावर वाहन वापरणाऱ्यास सतत अपडेट करते. जेव्हा वाहनाची उत्सर्जन पातळी सामान्यपेक्षा जास्त असते तेव्हा हे उपकरण अलर्ट देते.
Honda Activa H-Smart: स्कूटरमध्ये ‘हे’ फीचर्स आहेत
कंपनीने म्हटले आहे की, यात स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्ट बटणाच्या मदतीने युजर्सला लोकेशन संबंधित माहिती मिळते. नवीन स्कूटरमध्ये दिलेल्या स्मार्ट ऑप्शनच्या मदतीने युजर्स चावीशिवाय वाहन लॉक आणि अनलॉक करू शकतो. स्मार्ट-कीच्या मदतीनेच स्कूटर सुरू करता येईल. नवीन स्कूटरमध्ये इंजिन सुरू आणि बंद करण्यासाठी स्विच देण्यात आला आहे.
नवीन स्कूटरमध्ये अनेक नवीन टेक्नोलॉजी जोडण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. हे 110 cc PGM-FI इंजिन लावले आहे. यामध्ये OBD2 डिव्हाईस देखील देण्यात आले आहे. चांगल्या कामगिरीसाठी, इंजिनसोबत स्मार्ट पॉवर टेक्नॉलॉजी (eSP) वापरण्यात आली आहे, ज्यामुळे हे इंजिन लिनीर पावर जनरेट करण्यास सक्षम आहे.