आयफोन 12 हे भारतातील लोकप्रिय आयफोन मॉडेल आहे. कारण, या फोनमध्ये अनेक फीचर्स आहेत. आयफोनच्या या मॉडेलची किंमत अनेकदा बजेटच्या बाहेर असल्याने हा फोन खरेदी करणे शक्य नव्हते. पण काळजी करण्याची गरज नाही. कारण, फ्लिपकार्टवरून हे मॉडेल खरेदी करणे स्वस्त झाले आहे. यावर मोठी सूट देण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला येथे डिस्काउंट ऑफर्सची माहिती देत आहोत. तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. जाणून घ्या सविस्तर.
काय आहे डिस्काउंट ऑफर?
iPhone 12 खरेदी केल्यास फ्लिपकार्ट डिस्काउंट ऑफर देत आहे. आयफोन 12 ची किंमत 64 हजार 900 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टने या फोनवर 12 टक्के सूट दिली आहे. या सवलतीनंतर ग्राहकांना हा फोन 56999 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. ग्राहकांना एक ऑफरही दिली जात आहे. यामुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात.
एक्सचेंज बोनसचा मिळेल फायदा
या मॉडेलच्या खरेदीवर तुम्हाला 23,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. जर तुम्हाला हा एक्सचेंज बोनस पूर्णपणे मिळाला तर तुम्ही 56,999 रुपयांची किंमत 23,000 रुपयांपर्यंत कमी करू शकता. ही रक्कम कमी केल्यानंतर ग्राहक हा फोन फक्त 33,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या डिस्काउंट ऑफरमुळे ग्राहकांना एक सुवर्णसंधी मिळत आहे. जर तुम्हाला मोठ्या डिस्काउंटसह फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.