Hyundai Grand i10 Nios Facelift Launched : मार्केटमध्ये फोरव्हीलरची क्रेझ आहे. तरुणवर्ग फोरव्हीलर घेण्याकडे जास्त कल ठेवतो. आता फोरव्हीलर प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. Hyundai Motor India ने आपले Grand i10 Nios फेसलिफ्ट लॉन्च केले आहे.
या फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 5.69 लाखांपासून सुरू होते. त्यामुळं ही किंमतही सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येऊन जाईल. नवीन फेसलिफ्टद्वारे कंपनीने आपल्या हॅचबॅक पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कंपनीने फेसलिफ्टमध्ये अनेक वैशिष्ट्ये आणि कॉस्मेटिक अपडेट्स जोडले आहेत. चला जाणून घेऊयात सविस्तर..
.
2023 Hyundai Grand i10 Nios ची किंमत
नवीन Hyundai Grand Iten Nios Facelift (एक्स-शोरूम) ची किंमत 5.69 लाख रुपयांपासून सुरू होते. नवीन फेसलिफ्टच्या सर्व व्हेरियंटच्या किमती कंपनीने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. ग्राहक हे वाहन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन किंवा जवळच्या डीलरशिप सेंटरवरून ऑफलाइन बुक करू शकतात.
2023 Hyundai Grand i10 Nios: फेसलिफ्टमध्ये नवीन काय ?
नवीन Hyundai Grand i10 Nios च्या फ्रंट लूकमध्ये अपडेट्स दिसतील. समोरील बाजूची लोखंडी जाळी मोठ्या आकाराची असेल. ज्यामध्ये LED DRL चा वापर केला आहे. नवीन फेसलिफ्टमध्ये 15-इंच अलॉय व्हील आणि कनेक्टिंग बारसह एलईडी टेललॅम्प आहे. Grand i10 Nios दोन नवीन ड्युअल टोन शेड्ससह 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. फीचर्सच्या बाबतीत 6 एअरबॅग, क्रूझ कंट्रोल, TPMS सारखे अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत.
2023 Hyundai Grand i10 Nios: इंजिन आणि गिअरबॉक्स
नवीन Grand i10 Nios ही मागील मॉडेलसारखीच आहे. ज्यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 82 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी इंजिन 5-स्पीड एमटी आणि 5-स्पीड एएमटीशी जोडलेले आहे.