Credit Card : भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर चांगलेच वाढलेले आहेत. त्यामुळे लोकांचा खिसा चांगलाच खाली होत चालला आहे. जर तुमच्याकडे फ्यूल क्रेडिट कार्ड असेल तर यामुळे तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो. अनेक कंपन्या आहेत ज्या फ्यूल क्रेडिट कार्ड Fuel Credit card देतात.
जर तुम्ही हे क्रेडिट कार्ड Credit Card वापरत असाल तर तुमची इंधन भरण्यावर खूप बचत होऊ शकते. कशी ती जाणून घेऊयात
ICICI बँक फ्यूल क्रेडिट कार्ड Icici Bank Fuel Credit Card
तुम्ही ICICI बँक फ्युएल क्रेडिट कार्ड वापरून HPCL पेट्रोल पंपांवर जर 1 रुपया खर्च केला तर त्यासाठी तुम्हाला 2 पॉइंट मिळवू शकतात. यामध्ये तुम्हाला 2.5 टक्के कॅशबॅक मिळतो. यासोबतच 1 टक्के इंधन शुल्कही उपलब्ध आहे.
इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड Indian Oil Citi Bank Credit Card
तुम्ही इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड देखील वापरू शकता. सिटी बँक आणि इंडियन ऑइलचे को-स्पोन्सर्ड हे क्रेडिट कार्ड आहे. तुम्ही सदर कार्ड कोणत्याही इंडियन ऑइल आउटलेटवर वापरू शकता. या कार्डवर तुम्हाला काही ऑफर देखील मिळतात. या कार्डद्वारे तुम्ही रेस्टॉरंटमध्ये 15 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. तुम्ही इंडियन ऑइलच्या कोणत्याही रिटेलमध्ये खर्च केल्यास तुम्हाला त्यात 4 टर्बो पॉइंट मिळू शकतात.
इंडियन ऑइल एचडीएफसी क्रेडिट कार्ड Indian Oil Hdfc Bank Credit Card
HDFC बँकेने इंडियन ऑइलच्या सहकार्याने एक कार्ड लॉन्च केले आहे. इंडियन ऑइल एचडीएफसी क्रेडिट कार्ड असे या कार्डचे नाव आहे. जर तुम्ही या क्रेडिट कार्डद्वारे पैसे खर्च केले तर तुम्हाला फ्यूल प्वाइंट मिळतात. जे तुम्ही पेमेंट म्हणून वापरू शकता. या क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही डिझेल, पेट्रोलवर खर्च केलेल्या रकमेच्या ५ टक्के इतके इंधन मिळवू शकता. याशिवाय कार्डमध्ये इतरही अनेक फायदे उपलब्ध आहेत.