टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने एक नवा आदेश जारी केला आहे की टेलिकॉम कंपनीला प्रत्येक प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी किमान प्लॅन द्यावा लागेल. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर ट्रायने निर्णय घेतला आहे की एप्रिल महिन्यात संबंधित कंपन्यांना निर्देश दिले जातील. ट्रायने नवीन प्लॅन लिस्ट जारी केली आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतर ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना रिचार्ज प्लॅनचे आदेश दिले आहेत. सध्या बहुतांश प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहेत.
TRAI ने Airtel साठी दोन प्लॅनचे आदेश दिले
ट्रायच्या आदेशानुसार एअरटेलने 128 रुपये आणि 131 रुपयांचे 2 प्लॅन लाँच केले आहेत, ज्यांची वैधता 30 दिवसांपर्यंत असेल. यामध्ये लोकल एसटीडी कॉल2.5 पैसे प्रति सेकंद दराने, तर नॅशनल व्हिडिओ कॉलिंग 5 पैसे प्रति सेकंद, डेटा 50 पैसे प्रति एमबी आणि एसएमएस 1 रुपया लोकल आणि 1.5 रुपये स्टडी रेट असेल.
TRAI ने BSNL आणि MTLN साठी प्लान्स
बीएसएनएलने आपला रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे ज्यामध्ये तुम्हाला 199 रुपयांमध्ये 30 दिवसांची वैधता तसेच आणखी एक प्लॅन मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला ₹229 चार्जसह 30 दिवसांची वैधता दिली जाईल.
TRAI Order Jio साठी प्लान्स
ट्रायच्या आदेशानंतर जिओसाठी जो 1 महिन्यांचा म्हणजेच 30 दिवसांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये पहिला प्लॅन 259 रुपयांना येतो. ज्यात दररोज 1.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह एसएमएस देखील दिले जातील. 296 रुपयांमध्ये येणाऱ्या आणखी एका प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांच्या वैधतेसह 25 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह एसएमएस मिळतील.