मोदी सरकारने 2023 चा अर्थसंकल्प काल जाहीर केला. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आला. अनेक क्षेत्रांचा सर्वसमावेशक विचार या बजेटमध्ये केलेला दिसतो. दरम्यान यात पीएफ बाबत देखील घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेचा फायदा करोडो लोकांना होणार आहे.
बजेट 2023 Budget 2023
अर्थमंत्री निर्मला सीतारामन FInance Minister Nirmala Sitharaman यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प Union Budget 2023 सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यासोबतच भविष्य निर्वाह निधी (PF) बाबतही अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पीएफ खात्यातून पैसे काढणार्यांना या घोषणेचा फायदा नक्कीच होईल असे सांगण्यात येत आहे.
टीडीएस रेट TDS Rate
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार, पूर्वी ईपीएफमधून पैसे काढल्यावर 30 टक्के टीडीएस भरावा लागत होता. मात्र, आता तो कमी करण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला आहे. आता EPF काढण्यावर सरकारने 20 टक्के TDS प्रस्तावित केला आहे.
पीएफ PF
ईपीएफमधून पैसे काढण्यावर टीडीएस कमी केल्याने लोकांना खूप फायदा होणार आहे. ईपीएफ काढताना टीडीएस दर कमी केल्याने ज्यांचा पॅन क्रमांक ईपीएफओमधील नोंदींमध्ये अपडेट केलेला नाही अशा व्यक्तींना मदत होईल. त्याच वेळी, कमी उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये उत्पन्न मिळवणाऱ्यांना काही दिलासा देण्यासाठी पॅन नसलेल्यांसाठी पीएफ काढण्यावर कमाल किरकोळ दराने कर कपातीची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे. अशा व्यक्तींना आता 20% दराने TDS लागू होईल. त्याच वेळी, नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल.
ईपीएफ EPF
सध्याच्या आयकर कायद्यानुसार, EPF खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत पैसे काढल्यास TDS कापला जातो. EPFO कडे पॅन उपलब्ध असल्यास, पैसे काढण्याची रक्कम रु. 50,000 पेक्षा जास्त असल्यास 10% दराने TDS कापला जातो. तथापि, पॅन उपलब्ध नसल्यास, 30% दराने TDS कापला जातो.