How to Save Tax Under Section 80C of Income Tax Act : आज अनेकांना पैशांच्या बचतीचे महत्व समजले आहे. कोरोनाच्या कालावधीत जे काही पैसे नसल्याने हाल झाले त्यानंतर प्रत्येक जण पैशांच्या बचतीसाठी मार्ग शोधू लागला. परंतु तुम्हाला माहित आहे का की सरकारच्या काही योजना आहेत की जेथे तुमचे पैसे अगदी डबल होऊ शकतात.
विशेष म्हणजे या योजना सरकारी असल्याने यामध्ये पैसे बुडण्याची भीती राहत नाही. तसेच यावर इन्कम टॅक्स देखील लागत नाही. चला जाणून घेऊयात या योजना
सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana
पोस्टाद्वारे दिली जाणारी ही अत्यंत लाभदायी अन जास्त व्याजदर देणारी स्कीम आहे. विशेष म्हणजे या योजनेत पॅसीए लवकर डबल होतात. पोस्टमध्ये हे खाते मुलीच्या नावाने उघडता येते. खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर ती स्वतः त्या खात्याची मालक बनते. सध्या सदर योजनेमध्ये 7.6 टक्के व्याज मिळत आहे. याप्रमाणे साधारण नऊ वर्षात पैसे डबल होऊ शकतात. या खात्यामध्ये तुम्ही एका वर्षात किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.
पब्लिक प्रॉविडेंट फंड Public Provident Fund
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात PPF चा उद्देश दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे आणि सेवानिवृत्तीसाठी फंड जमकरने हा आहे. सध्या, PPF वर 7.1 टक्के वार्षिक दराने व्याज मिळत आहे, जे वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याजाने वाढते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र National Savings Certificate (NSC)
National Savings Certificates अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र मध्ये किमान रु 1000 जमा करता येतात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 5 वर्षांमध्ये मॅच्युअर होते, ज्यावर सध्या 7% दराने व्याज मिळत आहे. NSC मधील गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सूट देखील उपलब्ध आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची एक खास गोष्ट म्हणजे ते गॅरंटी म्हणून जमा करून तुम्हाला कर्ज घेता येते.
सीनियर सिटिजन सेविंग्स स्कीम Senior Citizen Saving Scheme (SCSS)
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही शासनाची अत्यंत महत्वाची योजना आहे. यामध्ये जबरदस्त व्याज मिळत आहे. ज्यांचे वय ५५ वर्षांहून अधिक आहे, ते निवृत्त झालेले लोकही यामध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु अशा लोकांसाठी, सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत SCSS मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीसाठी किमान रक्कम रु. 1000 आहे, तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा रु. 15 लाख आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते, जी मुदतपूर्तीनंतर 3 वर्षांसाठी पुन्हा नूतनीकरण करता येते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्या वार्षिक 8 टक्के दराने व्याज मिळत आहे. SCSS मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर लाभ उपलब्ध आहे, परंतु व्याज पूर्णपणे करपात्र आहे.