महागाईने अनेकांच्या नाकी नऊ आणले आहे. आता पुन्हा महागाईचा एक झटका बसणार आहे. आता तुम्हाला टीव्ही पाहणे लवकरच महाग होणार आहे. एका रिपोर्टनुसार, डीटीएच सेवा लवकरच महागणार आहे. म्हणजे महागाईचा फटका डीटीएच ग्राहकांनाही बसणार आहे.
नवीन टॅरिफ ऑर्डर (एनटीओ) 3.0 चा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. परंतु विशेष म्हणजे एकाचवेळी ही दरवाढ केली जाणार नाही. ईटीच्या रिपोर्टनुसार, डीटीएच ऑपरेटर ब्रॉडकास्टरने वाढवलेली किंमत ग्राहकांवर टाकू शकतात. डीटीएच सेवेची किंमत एकाच वेळी वाढवली जाणार नाही, ती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाईल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
50 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते
एकाचवेळी जर किंमती वाढवल्या तर ग्राहक नाराज होऊ शकतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ते वाढवण्यात येणार आहे. ग्राहकाचे बिल 25 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत वाढलेले दिसेल.
FICCI-EY 2022 च्या अहवालात म्हटले आहे की टीव्ही सब्सक्रिप्शनसाठी एवरेज रेवन्यू पर यूजर किंवा एआरपीयू 223 रुपये आहे. टाटा प्लेने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 4 ते 6 आठवड्यांत किंमत वाढवणार आहे.
डीटीएच बिलांवर लवकरच परिणाम होणार
येत्या काळात ग्राहकांच्या डीटीएच बिलांवरही परिणाम होणार आहे. मात्र, ही वाढ फारशी होणार नाही. डीटीएच ऑपरेटर नेटवर्क क्षमता शुल्क किंवा एनसीएफ मध्ये वाढ करत नसल्यामुळे ग्राहकांच्या बिलात 5% ते 6% वाढ होऊ शकते. भारतात ओव्हर-द-टॉप किंवा ओटीटी प्लेअर्स खूप वेगाने वाढत आहेत.
ते डीटीएच उद्योगासही टक्कर देत आहेत. त्यामुळे जर डीटीएच सेवा महाग झाली तर युजर्स ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.