Instagram chat recovery : इंस्टाग्राम हे सध्या पॉप्युलर होत चाललेले सोशल माध्यम आहे. सध्या तरुणवर्ग फार मोठ्या प्रमाणात याकडे आकर्षित होत आहे. यामध्ये तुम्ही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याबरोबरच एकमेकांशी चॅट देखील करू शकतात.
परंतु बऱ्याचदा सेक्युरिटी म्हणून आपण आपले चाट डिलिट करतो. पण हे करत असताना ते मॅसेज देखील कायमचे डिलीट होतात की जे तुम्हाला हवे असतात.
इंस्टाग्राम चॅट डिलीट झाल्यामुळे युजर्सची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पण तुम्हाला माहिती आहे का की अशीही एक ट्रिक्स आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही इन्स्टाग्रामवरून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करू शकता. होय, हे खरे आहे. तुम्ही इन्स्टा वरून तुमचे डिलीट झालेले मेसेज देखील पुन्हा मिळवू शकता. चला जाणून घेऊयात ट्रिक्स.
अशा पद्धतीने इन्स्टाग्रामवर रिकवर करा डिलीट झालेले मॅसेज
तुमच्या फोनमध्ये इन्स्टाग्रामचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड असावे आणि फोन पूर्ण चार्ज झाला असावा. जेणेकरून मेसेज रिकव्हर करण्याच्या प्रक्रियेत मध्यंतरी व्यत्यय येणार नाही.
काही काळापूर्वी इंस्टाग्रामने ‘डेटा डाउनलोड’ हे फीचर जारी केले होते, जे यूजरना डिलीट चॅट्स रिकव्हर करण्यास सुविधा देते. त्यात काही अटी देखील आहेत. जसे की तुम्ही डिलीट केलेले मेसेज 24 तासांच्या आत रिकव्हर करू शकता. चॅट डिलीट झाल्यापासून जास्त वेळ निघून गेला तर काहीच करता येणार नाही.
रिक्वेस्ट इंस्टाग्राम डेटा
Instagram Data डिलीट झालेले मॅसेज रिकवर करण्यासाठी ही सर्वात सामान्य पद्धत आहे. आपण हे रिकव्हर झालेले मॅसेज इंस्टाग्राम वर पाहू शकत नाहीत. त्याची रिकव्हरी ई-मेलद्वारे केली जाते. त्याची पद्धत जाणून घेऊया. प्रथम तुमचे Instagram खाते उघडा. प्रोफाइल वर जा आणि ‘Your Activity’ हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला तळाशी ‘Download Your Information’ हा पर्याय दिसेल. रिक्वेस्ट डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड टाका. यानंतर तुम्हाला एंटर केलेल्या ई-मेल आयडीवर एक मेल येईल. येथे ‘डाउनलोड इन्फॉर्मेशन’ निवडा आणि मॅसेज फोल्डरवर जा. येथे तुम्हाला डिलीट केलेल्या चॅट दिसतील.