मांसाहार करणारे अनेक शौकीन आपल्याकडे आहेत. रविवार म्हटलं की मग अनेकांचा चिकनचा बेत ठरलेलाच असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का की, चिकनच्या बाबत सरसकट आपण अनेक जण एक चुक करतो. बाजारातून चिकन घरी आणल्यानंतर लगेच नळाखाली धुवून घेतो.
कारण त्याने चिकन रेडी होते आणि ते शिजवण्यास तयार असते, असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण थांबा, इथेच चुकतो आहोत… संशोधनानुसार, नळाखाली चिकन धुणे धोकादायक आहे.
संशोधन काय म्हणते
एका संशोधनात असे समोर आले आहे की स्वयंपाक करण्यापूर्वी चिकन धुणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चिकन धुण्याची सवय ताबडतोब बंद करण्याची गरज आहे. जगभरातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि नियामकांनी कच्ची कोंबडी शिजवण्यापूर्वी धुऊ नये, अशी शिफारस केली आहे. चिकन धुण्यामुळे स्वयंपाकघरात धोकादायक बॅक्टेरिया पसरतात. चिकन न धुता चिकन पूर्णपणे शिजवण्याचा सल्ला दिला जातो आणि अशा प्रकारे बनवलेले चिकन खाणे सर्वात सुरक्षित मानले जाते. पण चिकनप्रेमींनाही याची माहिती नसते. नव्या संशोधनातून यासंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धोका कसा निर्माण होतो?
ऑस्ट्रेलियाच्या फूड सेफ्टी इन्फॉर्मेशन कौन्सिलने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ऑस्ट्रेलियातील जवळजवळ काही कुटुंबे स्वयंपाक करण्यापूर्वी चिकन धुतात. डच संशोधनात असे आढळले आहे की 25 टक्के ग्राहक वारंवार आणि नियमितपणे चिकन धुतात. चिकन धुण्याच्या जोखमीबद्दल संशोधन काय सांगते? अन्नजन्य रोगांची दोन मुख्य कारणे आहेत: कॅम्पिलोबॅक्टर आणि सॅल्मन.
ते सहसा कच्च्या कोंबडीवर आढळतात. कच्ची चिकन धुतल्यावर स्वयंपाकघरात हे जिवाणू सर्वत्र पसरतात आणि त्यामुळे आजार होण्याचा धोका वाढतो. चिकनवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबातून जिवाणू आसपासच्या गोष्टींवर म्हणजे नळ, भांडी, सुरी आणि कपड्यांवर लागू शकतात. त्यात आपण हाताने चिकन धुतो म्हणजे ते आपल्या शरीरातही जाऊ शकतात. यामुळे विषबाधा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मग चिकन कसे धुवावे?
तज्ज्ञांच्या मते चिकन नळाखाली धुण्यापेक्षा योग्य तापमानावर पूर्णपणे शिजविणे फायदेशीर ठरेल. पण त्याशिवाय चिकन कशी स्वच्छ करायची हे देखील आपण पाहुयात –
-कोंबडीवरील रक्त, अस्वच्छ घटक आपण टिशूपेपर काढून टाकू शकता.
-चिकन गरम पाण्याने धुवून घ्या. पाण्यात मीठ आणि हळद घाला. आता या उकळत्या पाण्यात चिकन थोडा वेळ ठेवा आणि नंतर धुवून टाका.
-याशिवाय चिकन गरम पाण्याने धुतल्यावर त्यात मीठ आणि हळद घालावी, ज्यामुळे विषारी पदार्थही नष्ट होतात.
-मांस फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर एअरटाइट कंटेनरमध्ये फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा आपल्याला ते शिजवायचे असेल तेव्हा दोन तास आधी फ्रीजरमधून बाहेर काढा.
-चिकन, मटण आणि मासे साफ करण्यासाठी वापरली जाणारी भांडी, अगदी सिंक देखील गरम पाण्याने धुवा.