महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. सध्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक पार पडली. आता कसबा आणि चिंचवड निवडणुकीवरून रान पेटले आहे. आता हि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे.
या पत्रामधून त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे निवडणूक बिनविरोध व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी या पत्रातून उल्लेख केली संस्कृती योग्य आहे का ते याविषयी पाहू.
तत्पूर्वी त्यांनी पत्रात काय म्हटलं आहे ते पाहू. या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांच निधन झालंय. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.
कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? पत्राच्या शेवटी त्यांनी असंही म्हटलं आहे की, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सर्वाना दाखवून देण्याची संधी आली आहे.
आता प्रश्न हा येतो की ज्या संस्कृतीचा विषय राज ठाकरे मांडला आहे तो योग्य आहे का. तर एकंदरीतच राज ठाकरे यांनी मांडलेलं मत योग्यच म्हणावं लागेल. त्यांनी पत्राद्वारे दर्शित केलेली संस्कृती ही महाराष्टाची शान वाढवेल यात शंका नाही. त्यामुळे त्यांचे कथन योग्यच आहे. परंतु आता प्रश्न येतो राजकीय पक्षांचा.
लोकशाही असल्याने सर्वानाच येथे अधिकार आहेत. तसेच मागील काही पोट निवडणूक पाहिल्या उदा. पंढपूर येथे सत्ताधिकाऱ्यांनी त्यावेळी निवडणूक लावलीच होती. त्यामुळे आता हे इतर पक्ष किती ऐकतील यात शंका आहे. त्यातच पदवीधर मध्ये जो निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने आला आहे तो जर पाहिला तर महाविकास आघाडीला कुठेतरी निवडून येण्याची शक्यता जास्त वाटते. त्यामुळे ही पोटनिवडूक बिनविरोध होईल यात शंकाच आहे.