दूरसंचार क्षेत्रामध्ये JIO , AIRTEL BSNL या दिग्गज कंपन्या आहेत. आपल्या ग्राहकांच्या सर्वोत्तम सुविधांसाठी त्या नेहमीच तत्पर असतात. सध्या Jio आपली 5G सेवा (Jio True 5G) वेगाने विस्तारत आहे. यामुळे लवकरच 5G सेवा क्रांती करेल असे म्हटले जात आहे.
कंपनीने जिओची 5G सेवा देशातील एकूण 184 शहरांमध्ये सुरू झाली आहे. आता या ठिकाणी ग्राहकांना जिओच्या हायस्पीड इंटरनेट सेवेचा लाभ मिळत आहे. जिओने आज नव्याने 5G सेवा सुरू केलेल्या 50 शहरांची नावे तुम्ही पाहू शकता.
Jio 5G नेटवर्क देशातील बहुतांश शहरांपर्यंत पोहोचले
रिलायन्स जिओ सध्या वेगाने विस्तारत आहे. आता कंपनीने देशातील बहुतांश शहरांमध्ये 5G नेटवर्क पोहोचवली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मंगळवारी, हरियाणा, गोवा ही दोन नवीन राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी जिओच्या या नेटवर्कमध्ये जोडले गेले आहेत.
जिओने मंगळवारी ज्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे, तेथे कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ग्राहकांना 1 Gbps+ स्पीडसह अमर्यादित डेटाचा एक्सेस देईल असे सांगितले जात आहे.
जिओची Jio True 5G सर्विस देशातील सर्व 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 184 शहरांमध्ये पोहोचली असल्याचा दावा कम्पनीच्या अधिकऱ्याने केला आहे.
देशातील सर्वत्र भागात जिओ नेटवर्क पोहोचवणार
कंपनी वेगाने आपला 5G चा विस्तार वाढवत आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, 2023 च्या अखेरीस Jio True 5G नेटवर्क देशाच्या सर्व भागात पोहोचेल.