वर्षांच्या शेवटी जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपले आवडते कलाकार की ज्यांनी वर्षभरात जबरदस्त परफॉर्मन्स दिला, उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपली कॅरेक्टर सुपरहिट केली असे अनेक नावे समोर येतात. चला तर मग अशाच काही कलाकारांवर नजर टाकूया ज्यांनी अविस्मरणीय परफॉर्मन्स दिला. हे असे कलाकार आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर जबरदस्त कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्तिक आर्यन : बॉलीवूडचा सर्वात यशस्वी स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्तिक आर्यनला बॉलीवूडला पुन्हा नव्याने सोनेरी दिवस आणून देणारा सुपरस्टार म्हटले जाते. कारण लॉकडाऊननंतर, त्याचा मुख्य अभिनेता म्हणून ‘भूल भुलैया 2’ हा बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला. जे पाहण्यासाठी अधिकाधिक प्रेक्षक जमले आणि मनोरंजन उद्योगालाही संजीवनी मिळाली. ज्याने सिनेमा मालक, प्रदर्शक आणि वितरकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. त्याच्या आगामी ‘शेहजादा’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने प्रेक्षक आणि चित्रपट रसिकांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे.
अल्लू अर्जुन : अल्लू अर्जुनच्या पुष्पा – द राइजने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक बेंचमार्क सेट केला. या चित्रपटाने केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठे प्रदर्शन केले आणि जागतिक स्तरावर 350 कोटींहून अधिक कमाई केली. अल्लूचा दमदार संवाद ‘झुकेगा नही साला’ चाहत्यांमध्ये इतका प्रसिद्ध झाला की त्यास अक्षरशः डोक्यावर घेतले.
KGF फेम यश : सुपर यशस्वी KGF फ्रँचायझी (KGF 1 आणि KGF: Chapter 2) सह यशने नवीन उंची गाठली आहे. प्रचंड चाहता वर्ग असलेला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये, यशने KGF: Chapter 3 बद्दल खुलासा केला आणि म्हणाला, आमच्याकडे त्याविषयी प्लॅनिंग आहे. परंतु सध्या नाही. मला अजून काहीतरी करायचे आहे. मी 6-7 वर्षांपासून KGF करत आहे. जर सर्व काही ठीक झाले तर आम्ही नंतर KGF 3 करू.
रकुल प्रीत : या वर्षी लीडिंग लेडी म्हणून उदयास आली आहे. ‘थँक गॉड’, ‘कटपुतली’, ‘रनवे 34’, ‘डॉक्टर जी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारून त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची स्थिती काहीही असो, रकुलने तिच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांवर एक वेगळी छाप सोडली आहे.
KGF स्टार यश पासून तर रकुल प्रीत पर्यंत.. 2022 मध्ये ‘ह्या’ स्टार कलाकारांनी अधिराज्य गाजवले
जाहिरात