Lata Mangeshkar Death Anniversary : आज संपूर्ण देश गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आठवणींमध्ये हळहळतोय. कारण आज त्यांची पहिली पुण्यतिथी. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्या आपल्यातून निघून गेल्या. तब्बल सात दशक त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजवले.
50,000 हून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत. हे एक मोठे रेकॉर्डच आहे. पण त्यांच्या आयुष्यात असेही काही प्रसंग आले होते की त्याची कल्पनाही करणे अशक्य आहे. त्यांच्यावर विष प्रयोग झाला होता. हा किस्सा त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत सांगितला होता. त्यांचे वय साधारण तेव्हा 33 वर्षे असेल.
विषप्रयोगानंतर त्या तीन महिने अंथरुणावर होत्या
1963 साली लतादीदींवर स्लो पॉयझनचा वापर करण्यात आला. ही घटना इतकी वेदनादायी होती की,
त्यानंतर त्या तीन महिने अंथुरणावर होत्या. त्यांना धड चालताही येत नव्हते. हा विषप्रयोग कुणी केला याची त्यांना कल्पना आली होती.परंतु ठोस पुरावा नसल्याने ते नाव कधीच समोर आले नाही. त्यामुळे त्यांना तक्रारही केली नव्हती.
विषप्रयोगानंतर आवाजावर परिणाम झाला का
त्यावेळी काही मीडिया रिपोर्ट्स असे आले होते की लतादीदींचा आवाज गेला. परंतु स्वतः लतादीदींनी याचा इन्कार केला. या सर्व अफवा असल्याचे सिद्ध झाले. विषप्रयोगाने त्यांच्या आवाजावर कसलाही परिणाम झाला नाही. कारण या मधून त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांनी हेमंत कुमार यांचे ‘कही दीप जले कही दिल’ हे गाणे गायले. हे गाणे देखील खूप हिट ठरले. यावेळी त्यांच्या आईची परवानगी घेऊन लतादीदींना रेकॉर्डिंग स्टुडिओत नेले होते. रेकॉर्डिंगमध्ये काही अडचण आली तर ते तिला लगेच घरी घेऊन येतील या बोलीवर लतादिदींना पाठवण्यात आले. पण रेकॉर्डिंग व्यवस्थित झाले आणि त्यानंतर त्या घटनेनंतर लतादीदींनी पुन्हा गाणे सुरू केले व त्यांनी कधीही मागे वळून पहिले नाही. त्यांनी अनेक सुपरहिट गाणे दिली. त्यांनी 36 भाषांमधून तब्बल 50,000 हून अधिक गाणी गायली आहेत.