वर्क फ्रॉम होम मुळे सध्या लॅपटॉपला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे विविध कंपन्यांनी आपले शानदार लॅपटॉप लॉन्च केले आहेत. आता Lenovo ने आपला नवीन लॅपटॉप लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप AMD Ryzen 3 7320U द्वारे सपोर्टेड आहे.
हा अतिशय पातळ आणि कमी वेट असणारा लॅपटॉप आहे. ‘Ideapad 1’ क्लाउड ग्रे रंगात येतो आणि 8 फेब्रुवारीपासून Lenovo Exclusive Stores, Lenovo.com, Amazon आणि आघाडीच्या रिटेल स्टोअर्सवर 44,690 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होईल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
Lenovo IdeaPad 1 Specifications
AMD Ryzen 3 7320U द्वारा संचालित या लॅपटॉपमध्ये इंटिग्रेटेड AMD Radeon 610M ग्राफिक्स आहे. यामुळे युजर्सना मल्टीटास्क करण्यास, ऑनलाइन क्लासेसमध्ये सहभागी होण्यास, मित्रांशी चॅट करण्यास आणि त्यांचे आवडते शो स्ट्रीम करण्यास मदत होते.
Lenovo IdeaPad 1 Features
Lenovo IdeaPad 1 मध्ये 15-इंचाचा डिस्प्ले आहे. यात डॉल्बी ऑडिओद्वारे 220 निट्स ब्राइटनेस आणि स्टिरीओ स्पीकर मिळतात. लेनोवो इंडियाचे डायरेक्टर ऑफ कंज्यूमर बिजनेस दिनेश नायर म्हणाले की आमचे आयडियापॅड हे इन क्लास परफॉर्मेंससह येणारे एक स्वस्त डिव्हाईस आहे. हे लोकांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यास मदत करते. लॅपटॉपमध्ये इन बिल्ट 720P HD कॅमेरा देखील येतो, जो फिजिकल प्रायव्हसी शटरसह येतो.