LIC Aadhaar Shila : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ही विविध गुंतवणुकीच्या योजना आणत असते. यामध्ये लहान मुलांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी विविध योजना असतात. lic शासकीय असल्याने त्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
ज्यांना गुंतवणुकीवर निश्चित परतावा हवा असतो व जोखीममुक्त गुंतवणूक हवी असते त्यांसाठी LIC एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो. याठिकाणी आपण LIC च्या LIC आधार शिला योजनेबाबत माहिती घेऊ. सदर पॉलिसी विशेषतः महिला आणि मुलींसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही दररोज 58 रुपये गुंतवून 8 लाख रुपये मिळवू शकता.
गुंतवणुकीची कमाल मर्यादा 3 लाख रुपये आहे
या योजनेत कमीत कमी 75 हजार रुपये गुंतवू शकता आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये गुंतवू शकता.
मॅच्युरिटी अवधी कमाल 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे. यामध्ये तुम्हाला 1, 3, 6 किंवा वार्षिक प्रीमियम उपलब्ध होईल.
58 रुपयांमध्ये 8 लाखांपर्यंत कसे कमावले जाऊ शकतात.
या LIC आधार शिला योजनेत तुम्ही दररोज 58 रुपये गुंतवल्यास, तुम्ही या योजनेत वर्षभरात 21,918 रुपये गुंतवू शकता. समजा तुम्ही हे 20 वर्षांपासून करत आहात आणि तुम्ही ही LIC आधार शिला योजना वयाच्या 30 व्या वर्षी सुरू केली आहे. अशा प्रकारे, या 20 वर्षांमध्ये, तुम्ही 4,29,392 रुपये गुंतवाल, मॅच्युरिटीवर तुम्हाला 7,94,000 रुपयांचा परतावा मिळेल.
8 ते 55 वयोगटातील महिलांसाठी चांगला ऑप्शन
LIC आधार शिला योजना 8 ते 55 वयोगटातील सर्व महिलांसाठी खुली आहे. महिलासनातही गुंतवणुकीसाठी ही स्कीम खरोखर फायदेशीर ठरू शकते.