Life Insurance Corporation of India: जर तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्ये Share गुंतवणूक Investment केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एलआयसीचा शेअर लिस्ट झाल्यापासून घसरणीच्या टप्प्यातून जात आहे.
शुक्रवारी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात Trading Session सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह शेअर 627 रुपयांवर पोहोचला. आता एलआयसीच्या बंपर नफ्याच्या बातम्यांमुळे त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक Investor करणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत 1,434 कोटी नफा झाला होता
चालू आर्थिक वर्षाच्या Economic Year सप्टेंबर तिमाहीत LIC चा निव्वळ नफा Profit अनेक पटींनी वाढून रु. 15,952 कोटी झाला आहे. विमा कंपनीला मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,434 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
स्टॉक एक्स्चेंजला Bombay Stock Exchange & National Stock Exchange पाठवलेल्या माहितीमध्ये, कंपनीने सांगितले की या तिमाहीत तिचे एकूण प्रीमियम उत्पन्न वाढून रु. 1,32,631.72 कोटी झाले, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. 1,04,913.92 कोटी होते.
एवढेच नाही तर, या तिमाहीत LIC चे एकूण उत्पन्न वाढून रु. 22,29,488.5 कोटी झाले, जे मागील वर्षी याच कालावधीत रु. 18,72,043.6 कोटी होते. शेअर बाजाराचा सामान्य ट्रेंड असा आहे की जेव्हा कंपनीला नफा होतो तेव्हा तो वर जातो आणि तोटा होतो तेव्हा तो खाली जातो. आता एलआयसीने मोठा नफा कमावला आहे, तर आगामी काळात त्याचा शेअर वाढण्याची अपेक्षा आहे.
यापूर्वी, रॉयटर्सच्या एका अहवालात दावा करण्यात आला होता की विमा कंपनी सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांचे लाभांश आणि बोनस शेअर्स देण्याच्या विचारात आहे. वास्तविक, या हालचालीमुळे कंपनीला तिची नेट वर्थ आणि गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकायचा आहे.