LIC Jeevan Azad Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) ही देशातील सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी आहे. LIC ने आतापर्यंत अनेक पॉलिसी प्लॅन बाजारात आणले. आता LIC ने जीवन आझाद (प्लॅन क्र. 868) LIC Jeevan Azad Policy लाँच केला आहे.
हा प्लॅन वैयक्तिक बचत आणि जीवन विमा या उद्देशाने एकत्रित अनेक प्लॅन आहे. हा खूप जबरदस्त प्लॅन आहे. यात खूप फायदे आहेत. चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर.
‘हे’ आहेत प्लॅन चे उद्दिष्टे
LIC जीवन आझाद ही मर्यादित कालावधीसाठी पेड-अप एंडोमेंट योजना आहे. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. त्याचप्रमाणे, योजनेमध्ये कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही लिक्विडिटी व्यवस्थापित करू शकता.
मॅच्युरिटीवर काय फायदे मिळतील
या योजनेंतर्गत, जर विमाधारकास एकरकमी रक्कमही दिली जाते. LIC जीवन आझाद योजनेंतर्गत बेसिक सम एश्योर्ड रक्कम आहे 2 लाख रुपये आहे आणि कमाल विमा रक्कम 5 लाख रुपये आहे. तुम्ही ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेऊ शकता.
मॅच्युरिटीवर काय फायदे होतील
या योजनेंतर्गत, जर विमाधारक मुदतपूर्तीपर्यंत जिवंत राहिला तर त्याला एकरकमी हमी रक्कमही दिली जाते. LIC जीवन आझाद योजनेंतर्गत किमान मूळ विमा रकमेबद्दल बोला, ती 2 लाख रुपये आहे आणि कमाल विमा रक्कम 5 लाख रुपये आहे. तुम्ही ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेऊ शकता.
किती वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल ?
या पॉलिसीमध्ये, तुम्हाला किती वर्षे प्रीमियम भरावा लागेल याचे कॅल्क्युलेशन साठी एक फॉर्मुला आहे. समजा तुम्ही 20 वर्षांची पॉलिसी निवडल्यास, तुम्हाला केवळ १२ वर्ष प्रिमिअम भरावा लागेल.
वयोमर्यादा आणि प्रीमियम भरण्याचे नियम
हा प्लॅन घेण्यासाठी किमान वय ९० दिवस अन कमाल वय 50 वर्षे आहे. तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक अंतराने प्रीमियम भरू शकता.
मिळतील ‘हे’ डेथ बेनेफिट
आता पॉलिसीच्या डेथ बेनिफिटबद्दल याठिकाणी पाहुयात. या योजनेअंतर्गत, रिस्क कव्हर सुरू झाल्याच्या तारखेनंतर परंतु मुदतपूर्तीच्या तारखेपूर्वी संपूर्ण पॉलिसी मुदतीदरम्यान विमाधारकाचा जर मृत्यू झाला तर कुटुंबियांना डेथ बेनेफिट मिळतील. LIC ने म्हटले आहे की डेथ बेनिफिट मृत्यूच्या तारखेपर्यंत ‘एकूण भरलेल्या प्रीमियम्स’ च्या 105% पेक्षा कमी नसेल.