LPG Gas Subsidy : देशात महागाई वाढली आहे. इंधन आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा बोजा पडला आहे.
गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गॅस सिलिंडर खरेदीवर केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात आले होते. मात्र, त्यांनी काही काळअनुदान देणे बंद केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
गॅसचे वाढते दर पाहून सर्वसामान्य माणूस अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारने यंदा नव्या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला असला तरी वाढत्या महागाईबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे.
मोदी सरकार याबाबत नवनवे निर्णय घेत आहे. गॅस सबसिडीबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडरधारकांसाठी केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. गरीब लोकांसाठी गॅस सबसिडी पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.
सरकारने गॅस सिलिंडर सबसिडीबाबत निर्णय घेतल्यास सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकार लवकरच गॅस सबसिडी जाहीर करण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीतून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडरमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातून आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.