राजकारणात कधी काय घडेल अन कोण कधी बाजी मारेल सांगता येत नाही. महाराष्ट्राचे राजकारण देखील सध्या अशाच प्रकारचे झाले आहे. दरम्यान आता राजकीय वर्तृळातून मोठी बातमी समोर येत आहे.
एका वृत्तानुसार विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar यांचे पुत्र पार्थ पवार Parth Pawar यांनी मंत्री शंभूराज देसाई Minister Shambhuraj Desai यांची भेट घेतली आहे. दरम्यान या भेटीनंतर मात्र चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी केलेलं सूचक विधान जास्त खळबळ उडवून देणार ठरलं आहे.
पार्थ पवार अन मंत्री शंभूराज देसाई Parth Pawar and Shubhuraj Desai यांच्या भेटीनंतर चर्चा असतानाच पार्थ पवार हे Parth Pawar (Rashtrawadi Congress Party) राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. त्यामुळेच त्यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतली असावी, असं गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्ताच्यामागे नेमकं काय अर्थ होता माहिती नाही परंतु चर्चा करणार्यांना मात्र उधाण आले आहे.
रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रो त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल. हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखाहून अधिक मतांनी पराभूत झालाचे शल्य त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच ही भेट झाली असावी, असं गोपिचंद पडळकर म्हणाले. दरम्यान ही भेट विकासकामांवर चर्चा करण्यासाठी झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी या भेटीबाबत पार्थ पवार यांनी काही बोलणे टाळले आहे.
शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगडवर यांची भेट झाली. पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली? तसेच या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.