spot_img
Tuesday, October 15, 2024
ताज्या बातम्यामहाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकीतहि पुनरागमन करेल:...

महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकीतहि पुनरागमन करेल: संजय राऊत

spot_img

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत सांगितले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) युती सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता राखेल. गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही पुढील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितल्यानंतर राऊत यांचे वक्तव्य आले आहे.

विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश आहे. राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून उर्वरित अडीच वर्षेही पूर्ण होतील. 2024 मध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार असून आम्ही सत्ता राखू. फडणवीस यांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, फडणवीस हे भाजपचे गोव्याचे प्रभारी होते आणि त्या राज्यात विजयाचा अंदाज लावत आहेत. गोवा म्हणजे काय ते फडणवीसांना लवकरच कळेल, असे राऊत म्हणाले.

शिवसेना नेते म्हणाले, पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही गोवा समजू शकला नाही. अनेक राजकीय पक्षांनाही हे समजलेले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये अनेक प्रसंगी मतभेद झाले असले तरी याचा सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. वेळोवेळी दिसून येणार्‍या या मतभेदांमुळे सरकारमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या