spot_img
Wednesday, March 22, 2023
ऑटोMahindra चा धमाका : फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी महिंद्राने लाँच केली नवी स्वस्त...

Mahindra चा धमाका : फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी महिंद्राने लाँच केली नवी स्वस्त एसयूव्ही

spot_img

नवी दिल्ली : महिंद्राने स्कॉर्पिओ-एन ला दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत अधिकृतरित्या लाँच केले आहे. स्कॉर्पिओ-एन एसयूव्ही झेड 4, झेड 8 आणि झेड 8 एल या तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही एसयूव्ही केवळ ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि २.२ -लीटर डिझेल इंजिनसह लाँच करण्यात आली आहे.

म्हणजेच, दक्षिण आफ्रिकन स्कॉर्पिओ-एनमध्ये फक्त एक इंजिन ऑप्शन आणि एक ट्रान्समिशन पर्याय मिळेल, तर त्याचे भारतीय मॉडेल देखील पेट्रोल इंजिन पर्यायासह येते आणि मॅन्युअल ट्रान्समिशन देखील उपलब्ध आहे. या कारची प्रारंभिक किंमत २१.९५ लाख रुपये आहे.

दक्षिण आफ्रिकेत लाँच करण्यात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये २.२ लीटर, चार सिलिंडर, mHawkडिझेल इंजिन आहे, जे १७२ बीएचपी पॉवर आणि ४०० एनएम टॉर्क जनरेट करते. यात ६ स्पीड टॉर्क कन्व्हेअर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. आरडब्ल्यूडी सेटअप मानक म्हणून उपलब्ध आहे. ग्राहकांना ४ बाय ४ व्हर्जनचा ही पर्याय देण्यात आला आहे. ही एसयूव्ही दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत केवळ ७ सीटर कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आली आहे.

फीचर्स – महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, ड्युअल बॅरल हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाइट्स, १८ इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, ड्राइव्ह मोड (झिप, झॅप आणि झूम), ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस देण्यात आले आहेत.

यात चार्जिंग, कूल्ड ग्लोव्ह-बॉक्स, १२ स्पीकर्स सोनी सोर्स म्युझिक सिस्टिम, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह ८ इंचटचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.

याशिवाय एसयूव्हीमध्ये इतरही अनेक फीचर्स आहेत. यात ड्युअल टोन इंटिरियर थीम, अॅड्रेनॉक्स कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ६ एअरबॅग आणि टीपीएमएस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या एसयूव्हीमध्ये चमकदार सिल्व्हर, डीप फॉरेस्ट, ग्रँड कॅनियन, एव्हरेस्ट व्हाईट, नेपोली ब्लॅक आणि रेड रेज कलरचे पर्याय देण्यात आले आहेत. दरम्यान, स्कॉर्पिओ-एन एसयूव्ही भारतीय बाजारात टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देत आहे. पण या एसयूव्हीची किंमत फॉर्च्युनरपेक्षा खूपच कमी आहे.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात