Fix Deposit अर्थात एफडी सध्या गुंतवणुकीच्या FD Investment बाबतीत लोकप्रिय आहे. पैसे सुरक्षित राहतात आणि त्यातून मिळणारे व्याज fd interest rates देखील जास्त मिळते. याठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच एका बँकेविषयी माहिती देणार आहोत की जेथे तुम्हाला सर्वाधिक व्याज Fix Deposit वर मिळेल.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँक Canara Bank एका विशेष योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर सात टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. (fd interest rates in canara bank) जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेच्या विशेष 400 दिवसांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. अलीकडेच कॅनरा बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 18 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत.
400 दिवसांची स्पेशल स्कीम
कॅनरा बँकेने Canara Bank एका ट्विटद्वारे सांगितले होते की, 400 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉजिटमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर जवळच्या शाखेशी canara bank near branch संपर्क साधू शकता. बँक सर्वसामान्यांना 400 दिवसांसाठी 7.45 टक्के दराने व्याज देते तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल.
666 दिवसांसाठी FD
बँक 666 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर सात टक्के दराने व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के दराने व्याज मिळणार आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 6.8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.3 टक्के दराने व्याज मिळेल.
रेपो दरात वाढ
रेपो दरात 2022 मध्ये रिझर्व्ह बँक आपल्याला सातत्याने वाढ करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक बँकांनी मुदत ठेवींच्या अर्थात Fix Deposit च्या व्याजदरात वाढ केलेली दिसते. आता आगामी महिन्यात अर्थात फेब्रुवारीत पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक होणार आहे. यावेळी देखील रेपो दरात वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.