नवी दिल्ली : मारुती सुझुकी दर महिन्याला अधिकाधिक कारची विक्री करते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे एरिना आणि नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या लोकप्रिय कारवर चांगली सूट आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. Alto, Alto K10, WagonR, S-Presso, Swift, Dzire आणि Celerio सारख्या कारला मारुती सुझुकी एरिना शोरूममध्ये 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
ही सूट कॅशबॅक, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनसच्या माध्यमातून आहे. दरम्यान, या महिन्यात मारुती कार खरेदीवर किती हजारणाचा फायदा होईल ते जाणून घेऊयात.
मारुती सुझुकीआपल्या टॉप सेलिंग कार ऑल्टो 800 वर 20,000 रुपये कॅश डिस्काउंट, 15,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. म्हणजेच ऑल्टो 800 च्या खरेदीवर तुम्हाला 39,000 रुपयांचा फायदा मिळू शकतो. या महिन्यात तुम्हाला अल्टो K10 वर 25,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3100 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणजेच एकूण 43100 रुपयांचा फायदा मिळू शकतो. तसेच या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर खरेदी केल्यास 25,000 रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपये कॉर्पोरेट बोनस मिळू शकतो.
स्विफ्ट आणि डिझायर
मारुती सुझुकीच्या लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्टवर या महिन्यात 25,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे डिझायर सेडान खरेदी केल्यास ग्राहकांना 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
S-Presso, Celerio आणि Eeco
मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या एंट्री लेव्हल हॅचबॅक एस-प्रेसोवर एकूण 44,000 रुपयांपर्यंत चा फायदा देत आहे. सेलेरियो हॅचबॅकवर ग्राहकांना 43 हजार रुपयांपर्यंत आणि इकोवर 24 हजार रुपयांपर्यंत चा फायदा मिळू शकतो. दरम्यान, हे सर्व फायदे डीलरशिप स्तरावर दिले जातात, ज्यामुळे वाहनांची विक्री वाढते.