सध्या पेट्रोल-डिझेल प्रचंड महाग होत चालले आहे. तसेच या इंधनांमुळे पर्यावरणाची देखील प्रचंड हानी होऊ लागली आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुणी सांगितले की, आता भविष्यात गायीच्या शेणावर कार धावतील तर विश्वास बसेल? पण हे खरे आहे. थोड्याच कालावधीत गायीच्या शेणावर धावणारी कार दिसू शकेल. विशेष म्हणजे कार सेक्टर मधील प्रसिद्ध कंपनी मारुती अशी कार आणणार आहे.
मारुती सुझुकी ग्रीन सॉल्यूशन साठी शेणाचा वापर करणार आहे. यासाठी जपानी ऑटो कंपनी सुझुकी आणि तिची भारतीय उपकंपनी मारुती यांनी हातमिळवणी केली आहे. कंपनीने या प्रकल्पांतर्गत 2030 सालापर्यंत 6 नवीन इलेक्ट्रॉनिक वाहने बाजारात आणण्याची योजना आखली आहे.
बायोगॅस बिजनेस हा एक अनोखा उपक्रम आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सुझुकीचा अनोखा उपक्रम म्हणजे बायोगॅस बिजनेस. ज्यामध्ये शेणापासून मिळणारा बायोगॅस म्हणजे डेअरी वेस्ट ज्यामध्ये मुख्यत्वे देशाच्या ग्रामीण भागात त्याचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल.
सीएनजी कारचा बाजारपेठेत सुमारे 70 टक्के वाटा
हा बायोगॅस सुझुकीच्या सीएनजी मॉडेलसाठी वापरता येईल. देशातील बाजारपेठेत सीएनजी कारचा वाटा ७० टक्के आहे. सुझुकी कंपनी केवळ भारतासाठीच बायोगॅसच्या आसपास सीएनजी ऑटोमोटिव्ह सोल्यूशन विकसित करण्यासाठी उत्सुक नाही तर भविष्यात अनेक कृषी क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय निर्यात करण्याची योजना देखील करत आहे. जसे की आफ्रिका, आसियान आणि जपान इ.
आर्थिक विकासाला देखील प्रोत्साहन
कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आमचा विश्वास आहे की देशातील बायोगॅस व्यवसाय केवळ कार्बन न्यूट्रॅलिटीमध्येच योगदान देणारनाही तर आर्थिक विकासाला देखील चालना देईल. कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, सुझुकीने बायोगॅसच्या वेरिफिकेशन साठी भारत सरकारची एजन्सी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि बनास डेअरी या एजन्सीसोबत सामंजस्य करार केला आहे.