मारुती ही ऑटो क्षेत्रातील नामांकित कंपनी. आपल्या वैशिष्ट्य पूर्ण कार्स मुले अनेक कंपन्यात ही दिग्गज कंपनी. मारुती सुझुकीने आज आपली मिड-साईज सेडान कार Maruti Ciaz देशांतर्गत बाजारात नव्या ड्युअल-टोन अवतारात लॉन्च केली आहे. कंपनीने या कारला नवा लूक दिला आहे. सेडान पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. आकर्षक लूक आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह सेडान दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. याची सुरवातीची किंमत कीमत (मॅन्युअल) 11.14 लाख रुपये तर (ऑटोमेटिक) 12.34 लाख रुपये अशी असणार आहे.
नवी मारुती सियाज आता तीन नवीन ड्युअल टोन पेंट स्कीमआणि एकूण 7 मोनो टोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये ब्लॅक रूफसह ड्युअल टोन पर्ल मेटॅलिक ऑप्शन रेड, काळ्या छतासह पर्ल मेटॅलिक ग्रे आणि ब्लॅक रूफसह डिग्निटी ब्राऊन कलर ऑप्शन देण्यात आला आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या दोन्ही पर्यायांसह बाजारात लाँच करण्यात आली आहे. नव्या रंगांव्यतिरिक्त कंपनीने या सेडान कारमध्ये काही खास सेफ्टी फीचर्सही जोडले आहेत. त्यामुळे गाडी अधिक सुरक्षित होते.
मिळतील हे खास सेफ्टी फीचर्स –
मारुती सुझुकीने या सेडान कारमध्ये 20 हून अधिक सेफ्टी फीचर्स जोडले आहेत. यात आता हिल-होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) मानक म्हणून समाविष्ट आहे. जे सर्व व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ड्युअल एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्युशन सह (ईबीडी) अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. ही कार प्रवाशांना अधिक सुरक्षा देईल, असा दावाही कंपनीने केला आहे.
पॉवर, परफॉर्मेंस आणि मायलेज –
मारुती सुझुकी सियाजच्या इंजिन मॅकनिझममध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. या कारमध्ये पूर्वीप्रमाणेच 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जी 103bhp पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. याचे मॅन्युअल व्हर्जन 20.65 किमी पर्यंत मायलेज देते आणि ऑटोमॅटिक व्हर्जन 20.04 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते.