महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील मल्लक स्पेशालिटी फॅक्टरीला भीषण आग लागली. कारखान्यातील ईओ प्लांटला आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीत लपेटलेला कारखाना पाच मजली आहे. पहिल्या मजल्यावर स्फोट झाला आणि आग लागल्याची माहिती मिळाली. आग लागली तेव्हा चार कामगार मजल्यावर उपस्थित होते. त्यापैकी एक बाहेर आला आणि इतर तिघे अजूनही आत आहेत.
छोटे छोटे स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. आग इतकी भीषण आहे की धूर दूरपर्यंत दिसत आहे. आगीचं नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीच्या घटनांनी बऱ्याचदा मोठे नुकसान होते.आता पुन्हा एकदा या आगीने खळबळ उडाली आहे.