spot_img
Saturday, October 12, 2024
आंतरराष्ट्रीयबेपत्ता झालेलं नेपाळचे विमान सापडलं: क्रॅश झाल्याची माहिती

बेपत्ता झालेलं नेपाळचे विमान सापडलं: क्रॅश झाल्याची माहिती

spot_img

बेपत्ता झालेल्या नेपाळच्या विमानाचा अखेर शोध लागला आहे. हिमालयातील मानापथीच्या दुर्गम भागात हे विमान दिसल्याची माहिती नेपाळच्या लष्कर विभागाने दिली आहे। मुस्तांगच्या कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर येत आहे
(nepal missing tara aircraft with 22 on board including 4 indians found at kowang of mustang)

नेपाळमधील खाजगी कंपनीचे हे छोटे प्रवासी विमान रविवारी सकाळी क्रॅश झाले असून त्यात चार भारतीयांसह २२ जण होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तारा एअरच्या विमानाने पोखरा येथून सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले आणि १५ मिनिटांनी कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. अपघातग्रस्त विमान नंतर कोवांग गावात सापडले. मात्र, विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला, त्यानंतर विमानाचा शोध लागला.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुस्तांगमधील कोबानजवळ नेपाळमधील या विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे विमान लामचे नदीच्या मुखाजवळ मानपाथी हिमालच्या खालच्या भागात कोसळले. नेपाळ लष्कर हे रस्ता मार्ग आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे, असे लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले, अशी माहिती ANI ने दिली आहे.

 

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या