तुर्कस्तान-सीरियात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या भूकंपाचा धोका पाहता भूकंपाच्या दृष्टिकोनातून मुंबई सुरक्षित आहे का? मुंबईत भूकंप झाला तर काय होईल? मुंबईचे टोलजंग टॉवर्स भूकंपाचे धक्के सहन करू शकतील का? यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
धोकादायक इमारतींवरील कारवाई स्थगिती
मुंबईत दिवसेंदिवस टोलजंग टॉवर्स उभे आहेत, येथील अनेक इमारती ५० ते ६० वर्षे जुन्या असून अजूनही धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. पालिकेने अशा इमारतींना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, या नोटिशीला स्थगिती देण्यात आली आहे.
भूकंप रोधक बांधकाम
मुंबईतील ३० ते ४० मजल्यांचे टॉवर्स पाहिल्यास या इमारती भूकंपाचे धक्के सहन करू शकतात असे त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
31 भूकंप प्रवण क्षेत्र
मुंबई आणि परिसरात असे एकूण ३१ भूकंपप्रवण क्षेत्र आहेत. गोवंडी, शिवाजीनगर, घाटकोपर, भांडुप, विद्याविहार, मुलुंड या भागांचा समावेश आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातील काही भाग भूकंपप्रवण क्षेत्रात आहे.
आयआयटी मुंबईचा अभ्यास
तुर्कस्तानमध्ये नुकताच ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. १६ व्या शतकात मुंबईत याच तीव्रतेचा भूकंप झाला होता. आणि मोठी जीवितहानी झाली. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. २००८ मध्ये काही संशोधकांच्या मदतीने आम्ही भूकंपाचा अभ्यास केला. मुंबई हे भूकंपाच्या नकाशावर झोन चारमध्ये येते.