नवी दिल्ली : जपानची वाहन निर्माता कंपनी निसान भारतीय बाजारपेठेत आपल्या युटिलिटी व्हेइकल रेंजचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत केवळ दोन वाहने विकते. यामध्ये निसान मॅग्नाइट आणि किक्स एसयूव्हीचा समावेश आहे. कंपनी लवकरच स्वस्त एमपीव्ही बाजारात आणणार आहे.
हे रेनोच्या ट्रायबर आधारित असेल. यापूर्वी रेनो आणि निसान ने एकाच प्लॅटफॉर्मवर रेनो कायगर आणि निसान मॅग्नाइट ची निर्मिती केली आहे. निसानची आगामी नवीन एमपीव्ही रेनो ट्रायबरवर आधारित असेल. सध्याच्या बाजारात उपलब्ध असलेली ही सर्वात स्वस्त ७ सीटर एमपीव्ही आहे. त्यामुळे निसानच्या आगामी ७ सीटर कारची किंमतही याच जवळपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेनो ट्रायबरची किंमत 6.33 लाख रुपये आणि टॉप व्हेरियंटची किंमत 8.97 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. निसानच्या एमपीव्हीमध्ये ब्रँडनुसार काही बदल होऊ शकतात. याआधी निसानने आपली नवी एक्स ट्रेल एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली होती. टोयोटा भारतीय बाजारात फॉर्च्युनरला टक्कर देणार आहे. सध्या या एसयूव्हीची चाचणी सुरू आहे. ही कार या वर्षाच्या मध्यात बाजारात येण्याची शक्यता आहे.
याशिवाय कंपनी Qashqai एसयूव्ही देखील बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे. निसानची आगामी परवडणारी एमपीव्ही सीएमएफ-ए प्लस प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, कंपनी रेनो ट्रायबरसारखेच इंजिन देऊ शकते, असे मानले जात आहे. त्यामुळे १.० लीटर चे नॅचरल एस्पायर्ड इंजिन आणि टर्बो पेट्रोल इंजिन बाजारात लाँच केले जाऊ शकते.