spot_img
Sunday, October 13, 2024
मनोरंजनआता तुम्ही 'KGF: Chapter 2' कुठेही आणि कधीही पाहू शकता, चित्रपट या...

आता तुम्ही ‘KGF: Chapter 2’ कुठेही आणि कधीही पाहू शकता, चित्रपट या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

spot_img

Amazon Prime Video ने KGF: Chapter 2 चे डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार विकत घेतले आहेत

‘KGF Chapter 2’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. यशचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट 1000 कोटींचा चा टप्पा पार करेल. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन 7 दिवस उलटले आहेत, मात्र चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. आता बातमी येत आहे की हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, Amazon Prime Video ने KGF: Chapter 2 च्या डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क विकत घेतले आहेत. OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट 27 मे रोजी Amazon वर प्रदर्शित होणार आहे. यामुळे तुम्ही हा चित्रपट कुठेही, केव्हाही पाहू शकाल.

KGF: Chapter-2 5 भाषांमध्ये 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. KGF: Chapter 2 हा त्याच नावाच्या चित्रपटाचा सीक्वल आहे, ज्याची निर्मिती होम्बले फिल्म्सच्या विजय किरागंदूर यांनी केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित, KGF: Chapter 2 ही रॉकीच्या उदयाची आणि त्याच्या शत्रूंशी झालेल्या चकमकीची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, मालविका अविनाश, प्रकाश राज, जॉन कोकेन आणि सरन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या