NPS Scheme : आज प्रत्येक व्यक्ती आपल्या रिटायरमेंट नंतरच्या लाईफसाठी तरतूद करत असतो. आता शासनाने पेन्शन बंद केल्याने सर्वच कर्मचारी या पद्धतीची तजवीज करण्यात गुंतलेले दिसतात. तुम्हीही जर म्हातारपणाची अर्थात रिटायरमेंट नंतरची आर्थिक व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. याठिकाणी आपण केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) या योजनेविषयी जाणून घेऊयात
रिटायरमेंट नंतरची लाईफ सुरक्षित राहील
राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे, ज्याद्वारे तुमचे वृद्धापकाळ सुरक्षित राहते. विशेष म्हणजे यात रिस्क देखील अगदी कमी आहे. विशेष म्हणजे पैसे मिळण्याची देखील खात्री आहे. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2004 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2009 मध्ये, ही योजना सर्व कॅटेगिरीसाठी खुली करण्यात आली.
40% एन्युटी गुंतवावी लागेल
या योजनेअंतर्गत, वर्किंग लाइफमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत, तुम्हाला 40% रक्कम एन्युटी मध्ये गुंतवावी लागेल. एन्युटीच्या रकमेतूनच तुम्हाला नंतर पेन्शन मिळते.
योजनेचे काय फायदे आहेत-
या प्लॅनमध्ये तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता
18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अंतिम रक्कम काढल्यावर 60% रक्कम ट्रॅक फ्री असेल.
NPS खात्यात कंट्रीब्यूशन लिमिट 14% आहे.
एन्युटी खरेदीमध्ये गुंतवलेली रक्कम देखील करमुक्त आहे.
दरमहा 20 हजार रुपयांहून अधिक पेन्शन मिळेल
या ठिकाणी एक उदाहरण पाहू. तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी या योजनेत महिन्याला 1000 रुपये गुंतवण्यास सुरुवात केली असे गृहीत धरा. निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे एकूण 5.4 लाख रुपये फंड जमा होईल. यावर 9 ते 12 टक्के परतावा मिळेल, त्यामुळे ही गुंतवणूक वाढून 1.05 कोटी होईल. जर 40 टक्के निधीचे एका वर्षात रूपांतर केले तर हे प्राइज 42.28 लाख रुपये असेल. त्यानुसार, 10 टक्के वार्षिक दर गृहीत धरल्यास, तुम्हाला दरमहा 21,140 रुपये पेन्शन मिळेल. यासोबतच तुम्हाला सुमारे 63.41 लाख रुपयांची एकरकमी देखील मिळू शकेल.