जर तुम्ही वनप्लस स्मार्टफोन OnePlus Smartphone घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास संधी आहे. अमेझॉनवर तुमच्यासाठी खूप ऑफर आहेत. या मर्यादित मुदतीच्या ऑफरमध्ये तुम्ही वनप्लसचा दमदार 5जी फोन OnePlus 10T 5G एमआरपीपेक्षा खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. 8 जीबी रॅम आणि 12 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 54,999 रुपये आहे, परंतु डीलमध्ये ती 49,999 रुपये असेल. बँकेच्या ऑफर अंतर्गत या फोनवर आणखी 1 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन तुम्ही 18,050 रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या सर्व ऑफरसह वनप्लस 10T 5Gवर एकूण सूट 24 हजार रुपयांपर्यंत जाते. हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असेल.
वनप्लस 10T 5G चे फीचर व स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 16 जीबीपर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट देण्यात येत आहे. वनप्लसचा हा फोन धांसू डिस्प्लेने सुसज्ज आहे. यात तुम्हाला 6.7 इंचाचा फुल एचडी+ फ्लुइड AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz चा टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील लावण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 50 मेगापिक्सलप्रायमरी लेन्ससह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये 4800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे 150 वॉट SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉइड 12 वर आधारित OxygenOS 12.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे पर्याय आहेत.