आज प्रत्येकालाच पैसे बचतीचे महत्व समजले आहे. आज अनेक लोक पैसे बचत करण्यासाठी विविध मार्ग शोधात आहे. आज आपण या ठिकाणी एक सरकारी योजना जाणून घेऊयात की ज्यामध्ये
गुंतवणूक करून तुम्ही कोट्याधीश देखील होऊ शकता.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड Public Provident fund म्हणजेच पीपीएफ असं या योजनेचं नाव आहे. यामध्ये उच्च दर्जाचे व्याजदर Interest मिळतात. या योजनेत 7.10 टक्के दरानं व्याज मिळत आहे. त्यात ही सरकारी योजना असल्याने जास्त रिस्क यात असणार नाही. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात –
25 वर्षांत व्हाल कोट्याधीश
तुम्हाला पीपीएफमध्ये 25 वर्षांत कोट्याधीश होण्याची संधी आहे. तुमची छोटी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते. जर या योजनेत एका वर्षात एक लाख 50 हजार रुपये असे 25 वर्षं गुंतवले. व्याज दर 7.1 टक्के असेल तर या संपूर्ण कालावधीत तुम्ही 37 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर 65 लाख 58 हजार 15 रुपये व्याज मिळेल. जर मुद्दल आणि व्याजाची रक्कम जोडली तर ती एक कोटी तीन लाख आठ हजार 15 रुपये होते. म्हणजे या योजनेद्वारे दरमहा 12 हजार 500 रुपये जमा करून तुम्ही 25 वर्षांत कोट्याधीश होऊ शकता.
मॅच्युरिटी कधी होते ? आधी पैसे काढू शकतो का ?
या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा कालावधी प्रत्येकी पाच वर्षांपर्यंत दोनदा वाढवता येऊ शकतो. योजनेच्या सातव्या वर्षापासून अंशत: पैसे काढण्याची परवानगी आहे. 15 वर्षानंतर पूर्ण रक्कम काढता येऊ शकते.