सध्या आयफोनची क्रेझ आहे. तुम्हालाही स्वस्तात नवीन आयफोन घ्यायचा असेल तर एक संधी आहे. आयफोन 14 सीरीजवर जबरदस्त ऑफर उपलब्ध आहेत. या सीरीज मध्ये कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यापैकी तुम्ही सध्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता.
Apple फोनमध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले, 12MP सेल्फी कॅमेरा आणि IP68 रेटिंग ऑप्शन मिळत आहे. हे फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, बँक ऑफर आणि इतर फायदे देखील यावर उपलब्ध आहेत. जाणून घेऊया iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती.
किती मिळतोय डिस्काउंट?
कंपनीने Apple iPhone 14 हा 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता. तुम्ही हा 69,999 रुपयांना खरेदी करू शकता. यावर HDFC कार्डवर 4000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. ही किंमत 128GB स्टोरेज वेरिएंटची आहे. 256GB स्टोरेज व्हेरिएंट 79,999 रुपयांना उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची किंमत 83,999 रुपये आहे. यावर तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे.
iPhone 14 Plus घ्यायचा असेल तर यावर देखील तुम्हाला HDFC कार्डवर 4000 रुपयांची सूट मिळेल. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 78,999 रुपये आहे. ही किंमत हँडसेटच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची आहे. तुम्ही स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता.
स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
Apple iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे. प्लस व्हेरिएंटमध्ये याच डिस्प्ले 6.7-इंच OLED स्क्रीनसह येतो. दोन्ही स्मार्टफोन Apple A15 Bionic चिपसेटवर काम करतात. ते 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.