Pathaan Box Office Worldwide Collection Day 3 : अनेक विवादांमध्ये फसलेला ‘पठान’ रिलीज झाल्यानंतर त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या या असिनेमाने भारतातच नव्हे तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर जादू चालवली आहे. या सिनेमाने रिलीज होताच पहिल्या तीनच दिवसांत मोठी कमाई केली आहे.
एका रिपोर्टनुसार या सिनेमाने तिसऱ्या दिवशी 300 कोटींची कमाई केली आहे. जरी या सिनेमाने भारतात फार मोठे कलेक्शन केले नसले तरी जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.
पठानने 300 कोटींचा टप्पा पार केला
ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, ‘पठान’ने भारतात 34 ते 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. शाहरुखच्या चित्रपटाने पहिल्या आणि दुस-या दिवशी ज्या प्रकारे कमाई केली ते पाहता ही संख्या खूपच कमी आहे. दरम्यान ‘पठान’ सिनेमा ‘दंगल’, ‘बाहुबली 2’ आणि ‘केजीएफ 2’च्या तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनची बरोबरी करण्यात अपयशी ठरला आहे. परंतु जगभरात त्याचा चांगलाच जलवा आहे. ‘पठान’ने अवघ्या तीन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. वीकेंडला या सिनेमाचे कलेक्शन कोणत्या नव्या उंचीवर पोहोचते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पहिल्या दिवसापासूनच सिनेमाने रचला इतिहास
‘पठान’चे ओपनिंग डे कलेक्शन 54 कोटी रुपये होते. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी आतापर्यंतचा सर्वात मोठे कलेक्शन केले आहे. त्याच वेळी, या चित्रपटाने जगभरात 106 कोटींची कमाई केली. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा घेत ‘पठाण’ने दुसऱ्या दिवशी भारतात 70 कोटींची कमाई केली. हे कलेक्शन जगभरातील बॉक्स ऑफिसवर 235 कोटींवर पोहोचले. आता तीन दिवसांत ‘पठाण’च्या जगभरातील कलेक्शनने 300 कोटींचा आकडा पार केला आहे.